मुख्य मजकुराकडे जा

पाबळ

शिरूर तालुक्यातील पंचायत गाव, मस्तानीच्या दफनस्थानासाठी ओळखले जाते.

पाबळ

पाबळ हे महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक पंचायत गाव आहे. हे मस्तानीच्या दफनस्थानासाठी ओळखले जाते. येथे तुम्हाला मस्तानीचे थडगे दिसू शकते.

सन २००९ मध्ये काही चोरट्यांनी खोदकाम करून मस्तानीची कबर उधळली होती. तिने आपले जीवन संपवण्यासाठी एक हिरा गिळला होता आणि तो त्या कबरीत आहे, अशी अफवा पसरली होती. कबर पुनर्संचयित करण्यासाठी गावातले मुस्लिम आणि हिंदू लोक स्थानिक प्रशासनावर दबाव आणण्यासाठी जमले होते.

केंदूर – पाबळ – लोणी ही गावे श्रीमंत बाजीराव पेशवे (पहिले) यांनी मस्तानीला इनाम म्हणून दिली होती.

स्थान

पाबळ तालुक्याच्या वायव्य कोपऱ्यात असून, उत्तरेस आंबेगाव तालुका व पश्चिमेस खेड तालुका आहे. ते वेल नदीच्या डाव्या (उत्तर) काठावर आहे. पाबळ हे जिल्ह्याचे मुख्य शहर पुण्यापासून ३९.३४ किमी अंतरावर आहे.

पाबळची जवळपासची गावे

पाबळपासूनची अंतरे (पूर्वीच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार):

गाव अंतर
कन्हेरसर ४.५ किमी
केंदूर ५.५ किमी
धमारी ६ किमी
वडगाव पीर ६.६ किमी

इतर जवळची गावे: मोराची चिंचोली, सरदवाडी, शिंदोडी, शिरसगाव काटा, सोनेसांगवी, टाकळी भीमा, टाकळी हाजी, तळेगाव ढमढेरे, तारडोबाची वाडी, उरळगाव, विठ्ठलवाडी, शिक्रापूर.

हेही पहा