निविदा

दानपेटी

देवस्थान समिती व ग्रामस्थांच्या उपस्थितीत बॅंक कर्मचाऱ्यांच्या मार्फत दानपेट्या उघडून निघालेल्या रक्कमेचा लगेच बँकेत भरणा केला गेला, व याचे सर्व व्हिडिओ चित्रीकरण केले गेले.

आर – ओ प्लांट

श्री यमाई देवी ट्रस्ट, कन्हेरसर यांच्या माध्यमातून गावामध्ये येणाऱ्या भाविकांच्या व ग्रामस्थांच्या आरोग्याला प्राधान्य देत शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी गावात आर ओ प्लांटच्या कामाचे उदघाटन करून कामास सुरुवात केली. या उपक्रमामुळे शुद्द पाणी मिळणार म्हणून, ग्रामस्थांकडून देवस्थान समितीचे आभार मानण्यात आले.

आर ओ प्लांट दिनांक २ एप्रिल २१ पासून करोना चे सर्व नियम पाळून साध्या पद्धतीने.. प्रशासाक समिती सदस्यांच्या उपस्थितीत कार्यरत करण्यात आला.