पेंद्या म्हणे ऋषेकेशी । आरुष बोबडे परियेसी ॥
यारे यारे अवघेजन । गाऊ हरिनाम कीर्तन ॥
कान्होपाठक बागडा । नाचे वैष्णवा पुढा ॥

Kanhuraj-Maharajपुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील एक गाव ‘केंदूर‘ या गावी श्री ज्ञानेश्वर महाराज ज्यांना अत्य़ंत आपुलकीने व आदराने ‘काका’ म्हणत असे कान्हुराज वारकरी संप्रदायातील थोर संत होते. कान्हो पाठक हे यर्जुवेदी कुळातील ब्राम्हण होते व त्यांना राजमान्यता ही होती.

कान्होपाठक सिध्दयोगी होते म्हणून ज्ञानेश्वराच्यां समाधीच्या वेळी संत नामदेव महारांज यांना दु:खाचा गहिवर अवरेना त्यामुळे नामदेव किर्तन करु शकले नाहित तेव्हा सर्व संतानी ज्ञानेश्वराच्यां समाधीचे किर्तन कान्हो महारांज पाठक यांना करण्यास लावले.

सद्गुरु नागेशांनी दृष्टांत देऊन कान्होराजास जंगलात जाऊन साधना करावी अशी आज्ञा केली. त्यानुसार ते केंदूर गावाजवळील पिंपळखोरे येथील जंगलात ओढ्याकाठी एका शिळेवर बसुन तपःश्चर्या करत त्यातुन त्यांना अनेक सिध्दि प्राप्त झाल्या. मग पुढे ते गुरुग्रही वेदांत अध्ययनासाठी गेले व तेथील अध्ययन फार थोड्या अवधीत कुशाग्र बुध्दी व एकपाठी असल्याने पुर्ण केले. पुढे आई – वडिलांनी त्यांचा विवाह लावून दिला. अतिशय सुशील व गुणवान असणार्‍या सुनेमुळे सासु – सासरे सुखावले. कान्होराजांचा संसार सुरळीत चालु झाला पण जन्मतःच विरक्त असणारे कान्होराज संसारत कसे रमणार? पुनः पिंपळखोरीत जाऊन साधना सुरु झाली व उरलेल्या वेळात समाजात धर्माचरण व शास्त्रमार्गाबद्दल उपदेश प्रचार करत असत. अशा रितीने 10 – 12 वर्षांचा काळ गेल्यावर आईवडिल व आप्तजनांच्या आग्रहामुळे त्यांना दुसर्‍या विवाहास सामोरे जावे लागले. दोन्ही पत्नी एकत्र अतिशय आनंदाने रहात होत्या त्यामुळे त्यांचा प्रपंच अतिशय सुखात चालला. कालांतराने माता – पित्याचे छत्र हरपले. सद्गुरु कृपेने संसारात राहुन शुध्द शास्त्राप्रमाणे आचरण ठेऊन समाजापुढे आर्दश ठेविला.

श्री संत श्रेष्ठ कान्होराज महारांज केंदूर या गावी ज्या वाड्यात रहात होते तेथे त्यांची समाधी असलेले मंदिर आहे. त्याठिकाणी दर वर्षी पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातो.

खालीलप्रमाणे वार्षिक उत्सव आहेत

  1. महाशिवरात्र-महाराजांची जयंती
  2. कोजागिरी पोर्णिमा
  3. काकडा भजन
  4. मार्गशीर्ष वद्य चतुर्थी ते त्रयोदशी कान्हुराज महाराज पुण्यतिथी उत्सव. पुण्यतिथी दिवस एकादशी
  5. पंढरपूर पायी वारी सोहळा
  6. प्रत्येक एकादशीला काकडा भजन आणि रात्री हरिजागर.

केंदुरला ऎतिहासीक पार्श्वभुमी असुन पुरातन काळातहि केंदुर बद्द्ल उल्लेख अढळतात.

मस्तानीला श्रीमंत बाजीराव पेशवे (पहिले) यांनी इनाम म्हणुन केंदुर – पाबळ – लोणी हि गावे दिली होती. मस्तानीची कबर पाबळ येथे आहे.

कृपया कान्हो पाठक महाराज यानी रचलेले साहित्य डाउनलोड करा download-button

पत्ता:

कान्होराज महाराज देऊळ वाडा मंदिर
केंदूर, महाराष्ट्र 412403

Google Map Link

https://maps.app.goo.gl/xrqZ1J96EeqqEPMRA

देवस्थानचे संपर्क तपशील

श्री. सारंग श्रीकांत राजपाठक (खजिनदार) – ९९७०१५४३९४
श्री. सतीश शरद राजपाठक (अध्यक्ष) – ९८५००८३०७३

यात्रेकरू सकाळी 9 ते 1 आणि संध्याकाळी 4 ते 7 या दरम्यान भेट देऊ शकतात.
मंदिर 1 ते 4 दरम्यान बंद राहिल.